Deputy CM Maharashtra

या संस्थेला अजित दादाची ८ कोटींची मदत जाहीर

दादा नी ज्या संस्थेबद्दल घोषणा केली या संस्थेचे बंद होण्याची चर्चा खूप दिवसापासून चालू होती आणि या संस्थेकडे आर्थिक सहाय्य नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यासंदर्भात आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये दादा बोलताना म्हणाले ” “सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


काय आहे सारथी संस्था:


छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि आमच्या संस्थेमध्ये जोरदार क्षेत्रांचा समावेश आहे, संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.


राजर्षी शाहूंचे नाव ह्या संस्थेसाठी समर्पक व औचित्यपूर्ण आहे. भारत शेतकऱ्यांचा देश आहे. सिंधू संस्कृतीपासून आजपर्यंत येथील शेतकऱ्यांनी आपली महान भारतीय संस्कृती घडवली आहे, जोपासली आहे. प्राचीन प्रजावत्सल राजे व आधुनिक समाजसुधारकांच्या परपंरांना जोडणारी कडी म्हणजे राजर्षी शाहू महाराज.प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो.”
शिक्षणाचे महत्व जाणणारा, शेतकरी हितासाठी दक्ष, दलित व इतर मागासवगीर्यांसाठी क्रांतीकारी पाऊले उचलणारा ह्या राजर्षीच्या नावाने स्थापलेली सारथी ही संस्था त्यांच्या कायार्ला पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *